Breaking News

शिवसेनेला धक्का ! ' येथील ' ६६ नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा !

 शिवसेनेला धक्का ! ' येथील ' ६६ नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा !

मुंबई : ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवक पैकी ६६ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यात जाऊन भेट घेतली असता , ६६ माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत .


 ६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच राहिल्या आहेत . त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आता अशी दुफळी ठाण्यात निर्माण झाल्याचे चित्र या भेटीमुळे दिसून येत आहे . दरम्यान , ठाण्यातील नगरसेवकांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे . त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे .

Post a Comment

0 Comments