google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का , निष्ठावंत आमदार शिंदे गटात जाण्यासाठी उत्सुक

Breaking News

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का , निष्ठावंत आमदार शिंदे गटात जाण्यासाठी उत्सुक

 शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का , निष्ठावंत आमदार शिंदे गटात जाण्यासाठी उत्सुक

सोलापूर | महाराष्ट्रात शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेला जी गळती सुरु झाली ती अद्याप थांबायला तयार नाही. शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ आता खासदारांचा देखील वेगळा गट शिंदे यांना जाऊन मिळाला आहे. आता शिवसेनेतील आमदार आणि नेत्यांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस  पक्षातील आमदार आणि नेत्यांचा भाजपप्रणीत शिंदे गटात जाण्याचा मनसुबा आहे.


भाजपप्रणीत शिंदे गटात जाण्यासाठी सोलापूरचे राष्ट्रवादीचे नेते उत्सुक असल्याचे दिसते. मोहोळचे निष्ठावंत आमदार राजन पाटील अगनरकर  हे आपल्या मुलांसोबत राष्ट्रवादीतील राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर आहेत. भाजपसुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. तर दुसरीकडे माढ्याचे ज्येष्ठ आमदार आणि साखरसम्राट बबन शिंदे  यांनाही भाजप खुणावत आहे. आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे  यांचे सहकारी आणि खाजगी कारखान्यांचे माठे जाळे आहे. त्यामुळे त्यांना स्वाभाविकच अनियमितीकरणावरुन अलीकडे केंद्रीय सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस आली होती. एकीकडे ते राष्ट्रवादीसोबत एकनिष्ठ असल्याच्या आणा भाका घेत आहेत, तर दुकरीकडे मांढा तालुक्यातील भाजप, आमदार शिंदे यांना जेरीस आणत आहेत.


अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे हे मागील विधानसभेला भाजपमध्ये पळण्याच्या तयारीत होते. पण त्यांना ते त्यावेळी साधता आले नाही. आता त्यांचे सहकारी महिबूब राजेभाई मुल्ला  आणि विलास गव्हाणे  या दोन्ही माजी सभापतींनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे म्हेत्रेंना केव्हा मुहुर्त मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाविरोधी असंतोष वाढतो आहे. तर काहींना ईडीची भीती आहे. त्यामुळे आता ते पक्षांना रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत, असे चित्र दिसत असून आता सेनेप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर वेळ आली आहे.

Post a Comment

0 Comments