वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी…! ‘हाय-वे’वरील गाडीच्या वेगाबाबत गडकरींची मोठी घोषणा..
वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.. महामार्गावर गाडी चालवताना चालकांना नेहमी ‘स्पीड मीटर’वर लक्ष ठेवावे लागते.. कारण, 90 च्या पुढे गाडीचा वेग गेल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागत होता. मात्र, आता काळजी करण्याचे कारण नाही.. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत नुकतीच मोठी घोषणा केली..
महामार्ग व ‘एक्स्प्रेस-वे’वरील ‘स्पीड लिमिट’ लवकरच वाढवण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी लवकरच ‘हाय-वे’वरील वेगमर्यादा वाढविणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, की “रस्ते सुसाट तर बनवले, मात्र त्यावरुन जाताना ‘स्पीड लिमिट’ ओलांडल्यास दंड अटळ आहे. रस्ता कसाही असो, त्यावर गाडीची गती 80 ते 90 च्या घरात ठेवली जायची. मात्र, आता लवकरच त्यावरच तोडगा काढणार आहोत.”
‘स्पीड गन’चा मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बंगलोरमध्ये बैठक होत आहे. त्यात केंद्र व राज्य मिळून नवे नियम तयार करणार आहे. त्यामुळे मोठ्या रस्त्यांवरुन आता चालकांना सुसाट गाडी नेता येणार आहे.. त्यासाठी लवकरच कायद्यात बदल केला जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.. त्यामुळे आता लवकरच ‘हाय-वे’वरील प्रवास सुसाट होणार आहे.
पुणे-औरंगाबाद 6 लेनचा करणार
दरम्यान, पुणे ते औरंगाबाद हा 268 किलोमीटरचा महामार्ग लवकरच 6 लेनचा केला जाणार आहे.. याबाबत अंतिम आराखडा तयार झाला आहे. हा महामार्ग 6 लेनचा झाल्यावर पुणे ते औरंगाबाद अंतर अडीच तासांत पूर्ण होईल. तसेच या रस्त्याला सुरत व चेन्नई, तसेच समृद्धी महामार्गही जोडला जाणार आहे. त्यासाठी तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे गडकरी म्हणाले..


0 Comments