Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांची प्रारूप मतदार यादी 'या' तारखेला होणार प्रसिद्ध; २९ जूनला आरक्षणाला मान्यता

 सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांची प्रारूप मतदार यादी 'या' तारखेला होणार प्रसिद्ध; २९ जूनला आरक्षणाला मान्यता 

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांची आरक्षण सोडत कार्यक्रम पूर्ण झाले असून, सध्या आरक्षणावर हरकती व सूचना मागवल्या आहेत.

मंगळवारी दि.२१ जून रोजी सर्व नगर परिषदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाचे सहआयुक्त एन.के.पाटील यांनी दिली दि.२१ जूनपासून नगरपरिषदांच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर आलेल्या हरकतींवर तसेच सूचनांचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून अभिप्राय देण्यात येणार आहे. त्यानंतर १ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी मतदान केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.


नगरपरिषदांची अंतिम प्रभाग रचना गुरुवारी, दि.९ जूनला प्रसिद्ध झाली असून मंगळवेढा , कुर्डुवाडी , बार्शी , मोहोळमधील काही प्रभाग रचनेत बदल झाले आहेत. पंढरपूर, अक्कलकोट, अकलूज, सांगोला, करमाळा, कुर्डुवाडी मैंदर्गी, दुधनी नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देऊन निवडणूक आयोग तसेच विभागीय आयुक्तांकडून जाहीर झाले आहे मुदत संपलेल्या जिल्ह्यातील दहा आणि नव्याने स्थापन झालेल्या अकलूज नगर परिषदांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत.


प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुनावणी घेतली. नगर परिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ४६ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शंभरकर यांनी त्यांच्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांकडे प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवलेला होता. विभागीय आयुक्त तसेच निवडणूक आयोगाने नगरपरिषदांची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असून, त्यानंतर आता मतदान केंद्रानिहाय प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे.


२९ जूनला आरक्षणाला मान्यता

१० जूनला आरक्षण सोडतीची नोटीस प्रसिद्ध असून, १३ जूनला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. बुधवारी , १५ जूनला हरकती व सूचना मागविण्यासाठी नोटीस प्रसिध्द होईल.


दि.१५ ते २१ जूनपर्यंत नागरिकांना आरक्षणावर हरकती व सूचना मांडता येतील . त्यानंतर २४ जूनला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे त्यांच्या अभिप्रायासह विभागीय आहेत . २९ जूनला विभागीय आयुक्तांकडे हरकती पाठविणार आयुक्तांकडून आरक्षणाला अंतिम मान्यता मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments