पंढरपूर तालुक्यातील तरुणाचा नदीच्या पात्रात संशयास्पद मृतदेह !
वालचंदनगर : पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात आढळला असून त्याचा खून झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नीरा नदीच्या पात्रात एका मृतदेह आढळला असून मृतदेहाच्या अवस्थेवरून त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सदर मृतदेह हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बादलकोट येथील विकास संभाजी पाखरे या २७ वर्षे वयाच्या तरुणाचा आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी नीरा नदीच्या पात्रात हा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले आहे. पुणे - सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील कुरवली, तालुका इंदापूर येथे नीरा नदीच्या पात्रात आढळलेला हा मृतदेह पोलीसाना देखील संशयास्पद वाटू लागला आहे.
काही लोकांनी हा प्रकार पहिला आणि नंतर मात्र येथील पुलावर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. सदर घटनेबाबत वालचंदनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. मृतदेहाची तपासणी करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले आहे.
सदर तरुण या पाण्यात कसा पडला की यामागे आणखी काही गैरकृत्य आहे याबाबत संशय निर्माण झाला आहे कारण या तरुणाच्या मृतदेहावर तशा काही संशयास्पद बाबी आढळल्या आहेत. सदर तरुणाचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात काळ्या रस्सीने बांधलेल्या अवस्थेत आढळले आहेत. सिंमेंटच्या खांबांसोबत त्याच्या पोटावर काळ्या रस्सीने बांधून त्याला पाण्यात टाकण्यात आले असावे असा पोलिसांना संशय आहे..
मयत पाखरे हा पंढरपूर तालुक्यातील बादलकोट गावाचा असून तो चालक असल्याची माहिती पोलिसांकडून समजत आहे. मानकरवाडी येथील पोलीस पाटील विलास कणसे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे हे अधिक तपास करीत आहेत.
पंढरपूर तालुक्यातील तरुणाचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात आढळला आणि मृतदेहाची परिस्थिती पाहून हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसत आहे. दोन्ही हात आणि पाय बांधून पाण्यात टाकलेल्या अवस्थेतील हा मृतदेह आहे त्यामुळे संशय व्यक्त करण्यास पुरेसा वाव आहे. पोटाजवळ देखील बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह दिसून आला आहे. सत्तावीस वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह हा पूर्णपणे संशयास्पद असून हा खून आहे की अन्य काही प्रकार आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. प्रथमदर्शनी मात्र हा खुनाचा प्रकार असावा असे चित्र दिसत आहे. हा नेमका काय प्रकार आहे हे पोलीस तपासात उघड होईलच पण सद्या तरी शंका व्यक्त केली जात आहे.


0 Comments