भारताचे विविध अवतारी पंतप्रधान “मोदी वारकऱ्यांच्या वेशात आज आगमन.. -
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहूमध्ये मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत.यापुढे वरील फोटो वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळासह मोदींना निमंत्रण दिलं गेलं होतं. देशाचे पंतप्रधान मोदी हे विविध कधी राजे ,कधी देव,कधी गंगा का ने बुलाया है इत्यादी अनेक अवतारी पुरुष म्हणून त्यांचा देशात मोठा चाहता वर्ग आहे.यानुसार त्यांचा आज नियोजित देहू दौरा आहे.
महाराष्ट्रात आणि देशभरात संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिळा मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमसाठी 50 हजारांच्या आसपास वारकरी येणार असल्याचे संस्थांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय पंतप्रधानांना देण्यासाठी संस्थांकडून खास पगडी तयार करण्यात आली आहे.यानुसार आज नवा वारकरी अवतार रुपात मोदी दिसणार आहेत.यापूर्वी त्यांची वारकरी अवतार जाहिरात बॅनर जागोजागी दिसत आहेत.
तर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत दौरा आहे. मात्र, यावेळी पंतप्रधान मोदींची वेषभूषा आणि त्यांच्या आगमनाचे लावलेले फलक यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पांडुरंगापेक्षा मोठे नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवण्यात येत आहे. हा तुकोबारायांचा तसेच वारकरी संप्रदायाचा अपमान आहे.इथला वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
मोदी सोहळा-सुरक्षितेसाठी मंदिर बन्द –
पुण्यात मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार नरेंद्र मोदींच्या हस्ते आज रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. साधारण दीड ते दोन तास हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. देहूमध्ये कडेकोट बंदोबस्त पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला असून देहूला अगदी छावणीचे स्वरूप आले असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या मुख्य मंदिर परिसर, सभेचे ठिकाण आदी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त केला आहे. स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे
कार्यक्रमाची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. संवाद सभेसाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पावलोपावली खडा पहारा दिसून येत आहे. परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. मुख्य देऊळवाड्याला फुलांची सजावट केली जाणार आहे. मुख्य मंदिरात आगमन होताना चारशे वारकरी त्यांचे स्वागत करणार आहेत.
येथे उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र दौऱ्याची लगबग असून देहूवासियांमध्येही उत्साह आहे.संवाद सभेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावणार आहेत. येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने सभास्थळी पर्स, बॅग, रिमोट चावी, पाणी बाटली, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर बँक आदी वस्तू नेण्यास परवानगीनाही. रंगीत तालीम झेंडेमळा येथे हेलिपॅड केले असून तेथून मोटारीने पंतप्रधान देहूतील मुख्य मंदिरात जाणार आहेत. लोकार्पण कार्यक्रमानंतर सभास्थळी येतील. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्याची सोमवारी रंगीत तालीम घेण्यात आली.
असा आहे आज महाराष्ट्र दौरा कार्यक्रम-
आज दुपारी 1:45 च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील.
विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांनी शिवसेनेला शह दिला होता. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र येणार आहे.देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईतील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार. संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मोदी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत.


0 Comments