google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना लागला वाढायला पुन्हा मास्कसक्ती होणार?

Breaking News

कोरोना लागला वाढायला पुन्हा मास्कसक्ती होणार?

 कोरोना लागला वाढायला पुन्हा मास्कसक्ती होणार?

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातले निर्बंध शिथिल केले होते. मात्र आता पुन्हा एकदा राज्यातली रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यातले रुग्ण वाढल्यास मास्क बंधनकारक करण्याचा विचार करावा लागेल असं विधान अजित पवारांनी केले४ होते.


त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे राज्यातले निर्बंध शिथिलच राहणार की आणखी कडक होणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बुधवारी संध्याकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार २४ तासात राज्यात हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सध्या ९८.०७ टक्क्यांवर गेलं आहे.

Post a Comment

0 Comments