google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस महिलेवर पोलिसाकडूनच बलात्कार; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

Breaking News

पोलीस महिलेवर पोलिसाकडूनच बलात्कार; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

 पोलीस महिलेवर पोलिसाकडूनच बलात्कार; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

शेगाव: ३२ वर्षीय महिला पोलिसावर पोलीस कर्मचाऱ्यानेच धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेली माहिती अशी कि, पोलीस विभागात कार्यरत ३२ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्यांची त्याच विभागात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या आकाश सुरेश वाघमारे रा.शेगाव याच्यासोबत ओळख झाली. २०१६ पासून २०२१ पर्यंत दोघांमध्ये नेहमी संपर्क होत होता. डिसेंबर २०२१ मध्ये आकाश वाघमारे याने पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून एका प्रकरणात बोलायचे असल्याचे सांगून शेगावला बोलावले. 


त्यानुसार पीडित महिला शेगाव येथे आल्यावर आरोपी पोलीस कर्मचारी आकाश वाघमारे याने एका लॉजमध्ये तिला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने पोलीस महिलेवर बलात्कार केला. ‘या संदर्भात तू कुणाला सांगितले, तर तुला व तुझ्या पतीला मारून टाकेल,’ अशी धमकी आरोपीने पीडित महिलेला दिली. भीतीपोटी पीडित महिलेने तक्रार देण्याचे टाळले. त्यामुळे आरोपीचे मनोबल वाढले.


दरम्यान, ३० मे २०२२ रोजी आरोपी आकाश वाघमारे याने पीडितेला पुन्हा फोन करून शरीर सुखाची मागणी केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने शेगाव पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात २ जून रोजी आरोपी आकाश सुरेश वाघमारे याच्या विरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments