google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अंगावर काटा आणणारी ही घटना आईनेच केली पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या !

Breaking News

अंगावर काटा आणणारी ही घटना आईनेच केली पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या !

 अंगावर काटा आणणारी ही घटना आईनेच केली पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या !

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एका आईने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अंगावर काटा आणणारी ही घटना भोकर तालुक्यातील पांडुरंगा गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मातेसह दोघांना ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, भोकर तालुक्यातील पांडुरंगा गावात काल रात्री एका आईने दोन वर्षाच्या मुलासह चार महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या आईची आणि भावाची मदत घेतली. तिघांनी मिळून दोन्ही मुलांचे मृतदेह जाळून टाकले. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.


धुरपतबाई निमलवाड असे हत्या करणाऱ्या आईचे नाव आहे, दत्ता आणि अनुसया असे खून झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. धुरपतबाई ला तीची आई कोंडाबाई राजेमोड, भाऊ माधव राजेमोड यांनी चिमुकल्यांचे मृतदेह जाळण्यास मदत केली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धुरपतबाई हीच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत क्रुरकर्मा आईसह तिघांविरोधात भोकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments