मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी-लेंडवे चिंचाळे येथे तरुणाचा खून; मामाने काढला 'भाची'च्या प्रियकराचा काटा
एका तरुणाचे भाचीसोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून चिडून जाऊन मामाने आपल्या भाचीच्या प्रियकराच्या डोक्यात व पोटावर मारून खून केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी-लेंडवे चिंचाळे रोडवर घडली आहे. तुषार सुरज धनवडे (वय.25 रा.वाटंबरे ता.सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणी मुलीचे मामा दत्तात्रय भारत शिंदे (रा.गोणेवाडी ता.मंगळवेढा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची फिर्याद मयत तरुणाचे वडील सुरज पंढरीनाथ धनवडे (वय.49 रा.वाटंबरे ता.सांगोला) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.1 जून रोजी सायकांळी रात्री 7 च्या नंतर ते आज दि.2 जून रोजी सकाळी 7.15 वाजण्याच्या पूर्वी फिर्यादीचा मुलगा तुषार सुरज धनवडे हा त्याच्या मित्रास सोडण्यासाठी पाठखळ येथे जातो म्हणून गेलेला असताना मुलगा तुषारचे व एक तरुणी यांचेत असणारे प्रेम संबंधाचे कारणावरुन चिडुन जावुन
त्या तरुणीचे मामा दत्तात्रय शिंदे (रा.गोणेवाडी ता मंगळवेढा) यांनी फिर्यादीच्या मुलास धारदार हत्याराने डोक्यात व पोटात मारुन गोणेवाडी शिवारात जिवेठार केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
तुषार यास जिवंत सोडणार नाही याधीच मामाने दिली होती धमकी
फिर्यादीचा मुलगा तुषार हा गावातील मुला समवेत पेटींगची कामे गावातील व इतर भागातील कामे करतो. फिर्यादीच्या गावातील अ.ब.क. ( बदलेले नाव वय अंदाजे 14 वर्षे ) हिचे व मुलगा तुषार हिचे प्रेम संबंध गेले सुमारे सहा महिण्यापासून असल्याचे फिर्यादिस माहित होते.
त्यातुनच अ.ब.क. हिचे मामा दत्तात्रय शिंदे रा.गोणेवाडी ता.मंगळवेढा यांनी गेले सहा महिन्या पूर्वी माझा मुलगा तुषार यांचे असलेले अ.ब.क. हिचेसोबत असलेले प्रेमसंबंधातून फिर्यादीकडे तक्रार केली होती व तिचा मामा दत्तात्रय भारत शिंदे याना मी त्याबाबत तुषार यास समजावुन सांगतो असे फिर्यादी म्हणाले होते.
परंतु तुषार यास जिवंत सोडणार नाही. व त्याचे हात किवा पाय काढून टाकतो. अशी धमकी सांगोला येथील वाढेगाव नाक्यावर तो आयसीयु दवाखाण्यात काम करीता असताना तेथे दिली होती .
0 Comments