दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला ओढून नेत समाज मंदिरात केला अत्याचार!
बारामती: बारामती तालुक्यात शुक्रवारी (दि. १०) भर सकाळी दुकानात साबण घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने समाज मंदिरात ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अभिमन्यू भारत लांडगे याच्या विरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, अल्पवयीन मुलीचे वय १५ वर्षे ७ महिने आहे. ती अल्पवयीन पिडीत मुलगी दुकानात साबण आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तेथे येत तिच्या डाव्या हाताला धरले. तु माझ्याबरोबर समाज मंदिरात चल, तु जर आरडाओरडा केला तर मी तुला मारून टाकेन अशी धमकी देत तिला समाज मंदिरात ओढत नेले. तेथील दरवाजा पुढे ढकलत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आता गुपचुप घरी जा, कोणाला काही सांगू नको, नाही तर तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फियार्दीत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल घुगे अधिक तपास करीत आहेत.


0 Comments