स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्राचार्य जयंत बागडे सर यांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली
धनगर आरक्षणातील लढाऊ नेते प्रा. जयंत बगाडे यांचे निधन
प्रा. जयंत बगाडे यांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून विश्व निर्माण करून संपूर्ण जिल्हाभर आपल्या नावाचा ठसा उमटवला. पिलीव गटामध्ये शेतकरी-व्यापारी यांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली.
सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रुजवात करणारे, शेतकऱ्यांसाठी पंढरपूर ते बारामती असा पायी मोर्चा काढणारे, धनगर आरक्षणासाठी तीव्र लढा उभा करणारे लढाऊ नेते तथा माजी जि.प. सदस्य प्रा. जयंत बगाडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रा. जयंत बगाडे यांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून विश्व निर्माण करून संपूर्ण जिल्हाभर आपल्या नावाचा ठसा उमटवला. पिलीव गटामध्ये शेतकरी-व्यापारी यांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली. चळवळी करणारे, तरुणांना मार्गदर्शन करणारे 1989 पासून यशवंत सेनेच्या स्थापनेमध्ये सहभाग असणारे नेते, जनतेला आपल्या वक्तृत्वातून विषय पटवून देणारे नेते अशी प्रा.जयवंत बगाडे यांची ओळख होती.
राजू शेट्टीना दिले बळ
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रा. जयंत बगाडे यांना सुरुवातीपासून आस्था होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्ह्यात मोठे काम करत होती. तिकडच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जात होते. या संघटनेची काम करण्याची हातोटी ओळखून बगाडे यांनी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कार्यास सुरुवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या समवेत अनेक सभा घेतल्या.धनगर आरक्षणासाठी तीव्र लढा
प्रा.जयवंत बगाडे यांनी धनगर आरक्षणासाठी तीव्र लढा सुरू केला. अनेक ठिकाणी ते आंदोलनाच्या अग्रभागी होते. त्यांचे मूळ गाव पिलिव होते.प्रा. जयंत बगाडे यांना सांगोला विधानसभा मतदारसंघातुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. सांगोला तालुक्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
0 Comments