आईनेच पोटच्या १९ वर्षीय गतीमंद मुलीचा गळा आवळून केला खून,अन..!
मुंबई: मुंबईत जन्मदात्या आईनेच पोटच्या १९ वर्षीय गतीमंद मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. अंधेरीतील सहार रोड परिसरातील पारशीवाडा येथे ही घटना घडली. मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव आरोपी आईने रचला होता. पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुंबईतील अंधेरी येथील सहार रोड पारशीवाडा परिसरात एका महिलेने आपल्याच पोटच्या १९ वर्षीय मुलीची हत्या केली. हत्या झालेली मुलगी ही गतीमंद होती. त्याला कंटाळून महिलेने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. आईनेच तिची आधी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी तपास केला असता, मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या पद्धतीवर पोलिसांना संशय आला. त्यानंतर मुलीचा मृतदेह कूपर रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात मुलीची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीची आधी हत्या केली, त्यानंतर मुलीने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले. संशय मुलीच्या आईवर गेली. पोलिसांनी मुलीच्या आईची कसून चौकशी केली. त्यावर आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, कापडी पट्ट्याच्या सहाय्याने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केल्याची कबुली आरोपी महिलेने पोलिसांकडे दिली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी ४१ वर्षीय आरोपी महिलेवर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.


0 Comments