दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, ‘दहावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार..!
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, ‘असा’ पाहा ऑनलाईन निकाल..!
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (ता. 17) जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. त्यानुसार, उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष दहावीचा निकालाकडे लागले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 15 जून उलटून गेल्यावरही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी चिंतेत पडले होते..
हावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी, तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीचा निकाल कधी लागतोय, याकडे लागले होते.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अखेर आज दहावीच्या निकालाची तारीख व वेळ जाहीर केली. त्यानुसार उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे..


0 Comments