Breaking News

बेशिस्त वाहन दाखवा, 500 रुपये कमवा..! नितीन गडकरींची अनोखी ‘स्कीम’...

 बेशिस्त वाहन दाखवा, 500 रुपये कमवा..! नितीन गडकरींची अनोखी ‘स्कीम’...

रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. वाहतूकीला शिस्त लागावी, यासाठी कायदे कडक करण्यात आले.. दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली.. मात्र, त्यानंतरही फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण कायम असल्याचे पाहायला मिळते..


वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिस तर उभा करणं शक्य नाही, ही बाब ओळखून मंत्री गडकरी यांनी लोकांनाच खास आवाहन केलं..गडकरी यांची अनोखी घोषणा

दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी वाहनांची बेसुमार संख्या व सर्रास नियमभंग करण्याची प्रवृत्ती, यावर जोरदार फटकेबाजी केली.. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवा व 500 रुपयांचे रोख इनाम मिळवा, अशी घोषणाच गडकरींनी केली.. तसेच बेशिस्त चालकांना 1000 रुपये दंड आकारण्याचा इशाराही दिला.


नियम तोडून रस्त्यांवरच वाहन पार्किंग करणाऱ्या चालकांची ही प्रवृत्ती रोखण्यासाठी 1000 रुपये दंड आकारला जाईल, त्यासाठी आपले मंत्रालय लवकरच कायदा आणण्याचाही विचार करीत असल्याचे ते म्हणाले. इमारत बांधताना पार्किंगसाठी पुरेशी जागा न ठेवणे खेदजनक आहे. पार्किंगच्या जागेअभावी लोक रस्त्यांवरच वाहने उभी करीत असल्याचे ते म्हणाले.मंत्री गडकरी म्हणाले, की ‘नागपूरला माझ्याकडे स्वयंपाक करणाऱ्यांकडे 2-2 सेकंड हॅंड गाड्या आहेत. चार जणांच्या कुटुंबात आज 6 कार असतात. दिल्लीचे लोक त्यातल्या त्यात भाग्यवान आहेत, त्यांना वाहने उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी जागा उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले..


एखाद्याने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवल्यास त्या व्यक्तीला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यासाठी सरकार लवकरच अशा प्रकारचा कायदा आणणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.. त्यांच्या या निर्णयाबाबत अनेकांनी प्रतिक्रिया देताना, कमाईचा हा चांगला मार्ग असल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments