*मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यास अटक करा*
सांगोल्यात मुस्लिम समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न
सांगोला : अल्लाहचे प्रेषित व इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्या नुपूर शर्मा व दिल्लीचे भाजप मीडियाप्रमुख नविन जिंदाल यांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सांगोला येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी १०:३० वा तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. हे निवेदन दर्गा मस्जिदचे मौलाना ईरशाद मुलाणी यांनी तहसीलदार अभिजीत पाटील यांना दिले.
या निवेदनामध्ये आपला देश विविध समाज व समुदायांनी संपन्न लोकशाही प्रदान राष्ट्र आहे. दिवसेंदिवस अल्पसंख्याक समाजावरील अन्यास व अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंता वाढविणाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची निष्काशीत प्रवक्ता दिल्ली येथील नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांना राष्ट्रीय चॅनलवर मुस्लिम समाजाचे प्रेषीत मोहम्मद पैंगंबर यांच्या विषयी निंदनीय व अपमानास्पद वक्तव्य केले आहे. यामुळे सांगोला येथील तसेच देशातील मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.
समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावणार्या संबंधीत समाज कंटकावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई व्हावी. म्हणून आजरोजी निवेदक प्रस्तुतचे निवेदन शासनास देत आहेत. संबंधीतांनी केलेल्या कृत्याचा व वक्तव्याचा याब्दारे निषेध व्यक्त करीत आहोत. संबंधीतावर गुन्हा दाखल व्हावा व योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर तैहिद मुल्ला, अॅड. इनामदार, अॅड. पटेल, सहील खतीब, इम्रान मुल्ला, फारुक खतीब, कमरूद्दिन खतीब, कादिर इनामदार, मोहसिन खतीब, निसार तांबोळी, हमिद मुल्ला, रफिक नदाफ, नवाज तांबोळी, आयाज मणेरी, जुबेर मुजावर, सईद शेख, शाहरुख तांबोळी, शाहरुख मुलाणी, अस्लम मुलाणी, बशीर मुलाणी, निहाल तांबोळी, अशपाक मुलाणी, इम्रान काझी, आलीम आतार, आलीम बागवान, तौफिक मुजावर, मोहसीन मुजावर, अमजद बागवान यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे.
निवेदन दिल्यानंतर हाजी शब्बीर खतीब व मौलाना ईरशाद मुलाणी यांचे मनोगत झाले. या मनोगतात हाजी शब्बीर खतीब हे म्हणाले की, नुपूर शर्मा ने जे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बोलले आहे त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यावर सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी व नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांना अटक करावी अशी मागणी केली व त्या दोघांना लवकरच अटक होणार अशी इच्छा व्यक्त केली.
निवेदन देण्यासाठी सर्व मशिदीचे मौलाना, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, बापूसाहेब ठोकळे, कमरुद्दिन खतीब, सांगोल्यातील सर्व मुस्लिम समाज बांधव, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बंधु, सांगोल्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:
प्रेशितांचे अपमान सहन करणार नाही
मुस्लिम बांधव हे सर्व सहन करू शकतात. जर कोणी त्यांच्या विरोधात बोलत असेल तर ते सहन करू शकतात, पण जर विषय हा हजरत मोहम्मद पैगंबरांवर येतो तेव्हा आम्ही ते सहन करणार नाही. आज संपूर्ण जगभरात मुस्लिम बांधव हे तडपडत आहे. जसा मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर तडपडतो तशीच परिस्थिती आज या जगातील मुस्लिम बांधवांची झाली आहे. नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. जर त्यांना तत्काळ अटक झाली तर मुस्लिम समाज हा शुक्राना नमाज पठण करणार असे त्यांनी नवस केले.
- ईरशाद मुलाणी
इमाम शाही दर्गा मस्जिद सांगोला




0 Comments