सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी दहा कोटी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील
भिमनगर येथील दीक्षाभूमी कट्टया समोर सांस्कृतिक भवन बांधणेसाठी दीड कोटी मंजूर.
सांगोला (वार्ताहर) सांगोला नगरपरिषदेच्या सांगोला शहरातील विविध विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून दहा कोटी रुपयांचा निधी काल मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. यापूर्वी शहरातील विविध विकास कामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून नवीन दहा कोटी रुपये मंजूर झाल्याने गेल्या वर्षभरामध्ये एकूण तीस कोटी रुपये सांगोला नगरपरिषदेस मंजूर झाले आहेत. शिवाय वंदेमातरम चौक ते मिरज रोड बायपास रस्त्याला अधिकचा नवीन ५ कोटी रुपयांचा निधी या आठवड्यामध्ये मंजूर होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
काल मंजूर झालेल्या निधीतून भिममनगर येथे दीक्षाभूमी कट्ट्या समोर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दीड कोटी, साठेनगर येथे अंगणवाडी व अभ्यासिका बांधण्यासाठी ५० लाख, आरक्षण क्रमांक ४७ चिंचोली रोड बगीच्या विकसित करण्यासाठी १ कोटी, सांगोला शहर गावठाण नवीन वसाहत व वाड्यावस्त्यासाठी पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी २ कोटी ५० लाख, जय भवानी चौक येथील आरक्षण क्रमांक २४/१ शॉपिंग सेंटर वरती पहिल्या मजल्यावर दुकान गाळे बांधण्यासाठी २ कोटी, महादेव मंदिरा समोर सभामंडप बांधण्यासाठी ४० लाख.
कोपटे वस्ती गणपती मंदिराजवळ बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी २५ लाख, इंगोले पट्टा समाज मंदिर बांधणे १५ लाख, गेजगे वस्ती समाज मंदिर बांधणे १५ लाख, खारवटवाडी हनुमान मंदिर येथे समाज मंदिर बांधणे १५ लाख, सुतार- भुईटे वस्ती येथे समाज मंदिर बांधणे १५ लाख, चिंचोली रोड ते पश्चिमेस सर्वे नंबर ५४८ रस्ता करणे २० लाख, चिंचोली रोड सर्वे नंबर ५२१ व ५४८ मधून पश्चिमेस रस्ता करणे ५० लाख, बिलेवाडी भाऊसो गायकवाड सुभाष देशमुख शेत रस्ता करणे २० लाख, पंढरपूर रोड ते सोपान बिले विहीर ते प्राथमिक शाळा रस्ता करणे ३५ लाख असे एकूण १५ कामांसाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरामध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सांगोला शहरातील अनेक विकासकामांसाठी ३० कोटी रुपये मंजूर केले असून बायपास रस्त्यासाठी कमी पडत असलेला ५ कोटी रुपयांचा अधिकचा निधी येत्या आठवड्याभरा मध्ये मंजूर होणार असल्याने बायपास रस्त्यासाठी एकूण १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नगरपालिका स्थापनेपासून आजपर्यंत एका वर्षामध्ये मंजूर झालेला ३० कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामुळेच मिळाला असून सांगोला शहरातील अनेक विकासकामांना गती मिळणार असून आगामी काळामध्ये सांगोला शहराचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ यांनी दिली.



0 Comments