Breaking News

दारूच्या नशेत जावयाने कुऱ्हाडीने वार करत सासू-सासर्‍यांचा केला खून!

 दारूच्या नशेत जावयाने कुऱ्हाडीने वार करत सासू-सासर्‍यांचा केला खून!

नागपूर : दारूच्या नशेत मध्यरात्री वृद्ध सासू-सासर्‍यांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अमर नगर परिसरात घडली आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत अमर नगर परिसरात दुहेरी हत्याकांड झाले असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. नरमु यादव या व्यक्तीने दारूच्या नशेत मध्यरात्री त्याच्या वृद्ध सासू-सासर्‍यांवर कुऱ्हाडीने वार केले. 


या घटनेत भगवान रेवारे आणि पुष्पा रेवारे गंभीर जखमी झाले.व त्यांचा मृत्य झाला आहे.दरम्यान, या घटनेत यादव याची पत्नी कल्पना व मुलगी मुस्कान या दोघींवर देखील कुऱ्हाडीने वार झाल्याचे समजते. त्या दोघांची स्थिती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तसेच, या घटनेचा तपास पोलीस कसून करीत आहेत.

Post a Comment

0 Comments