सरकार वाचविण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक पार; पवारांनी ‘हा’ विश्वास केला व्यक्त!
मुंबई : महाविकास आघाडी भक्कम राहील आणि कोर्टात देखील व्यवस्थितीत भूमिका राहील असा सल्ला राष्ट्रावादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आघाडीमधील नेत्याना दिला आहे.
आज शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आघाडीतील नेत्यांसोबत एक महत्वपुर्ण बैठक पार पडली या बैठकीत पवारांनी सरकारला कोणताही धोका नसून ते भक्कम राहिल असा विश्वास दिला.एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले. त्यामुळे आता राज्यातील सरकार वाचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरु आहेत.
याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत शिवसेना कायदेशीर प्रक्रिया कशी पार पाडत आहे याची माहिती अनिल देसाई आणि अनिल परब यांनी शरद पवारांना दिली. तसेच, महाविकास आघाडी एकत्र येऊन बंडखोरांविरोधीत कायदेशीर लढा लढू असेही शरद पवार यांनी या बैठकीत सांगितले.


0 Comments