दादागिरी करू नका; एकनाथ शिंदे यांना आरपीआय संरक्षण देईल केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत. अशातच या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी जबरदस्त एन्ट्री केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर किंवा कार्यालयांवर हल्ले कराल तर याद राखा, असा सज्जड इशारा देतानाच बंडखोर आमदारांना आरपीआयचे कार्यकर्ते संरक्षण देतील, अशी घोषणा ना. रामदास आठवलेंनी केलीय.
महाविकास आघाडीचा मुख्य घटकपक्ष असलेल्या शिवसेनेतून बंड करून सुमारे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत आहेत. या बंडखोर आमदारांच्या साथीने भाजप महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचे दृष्टिपथात येताच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले सक्रिय झाले आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करताना ना. रामदास आठवले.
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असून सरकार स्थापन करण्याची आपल्याला घाई नाही. शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत आपण कोणतीही घाई करणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करताना ना. रामदास आठवले.
ना. रामदास आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार मुंबईत आल्यावर ते आपला मताचा अधिकार बजावतील. मात्र, त्यांच्यावर कोणी दादागिरी करू नये. दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. आमदार आणि त्यांच्या कुटुंबावर आणि कार्यालयावर हल्ला करण्याची दादागिरीची चुकीची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील. त्यांना साथ देतील, असा ईशारा ना.रामदास आठवले यांनी दिला.
ना.रामदास आठवले म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 आमदार असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध होईल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
आमदार आणि त्यांच्या कुटुंबावर आणि कार्यालयावर हल्ला करण्याची दादागिरीची चुकीची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील. त्यांना साथ देतील” असा इशारा ना.रामदास आठवले यांनी दिला.
ना. आठवले म्हणाले की, “शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजप सोबत युती करावी या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकत्र आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची महाविकास आघाडीची खेळी हा या आमदारांवर अन्याय ठरेल. या आमदारांवर निलंबन कारवाई असंविधानिक ठरेल. अशी चुकीची, घटनाविरोधी कृती महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही.”
“एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार मुंबईत आल्यावर ते आपला मताचा अधिकार बजावतील. मात्र त्यांच्यावर कोणी दादागिरी करू नये. दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. आमदारआणि त्यांच्या कुटुंबावर आणि कार्यालयावर हल्ला करण्याची दादागिरीची चुकीची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील. त्यांना साथ देतील” असा इशारा ना.रामदास आठवले यांनी दिला.


0 Comments