Breaking News

सांगोला भीमनगर येथे दीड कोटी निधी मंजूर केल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार संपन्न भीम नगर येथे प्रथमच मोठा निधी मिळाल्याची समाजाची भावना.

 सांगोला भीमनगर येथे  दीड कोटी निधी मंजूर केल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार संपन्न

भीम नगर येथे प्रथमच मोठा निधी मिळाल्याची समाजाची भावना.

 सांगोला/ प्रतिनिधी सांगोला शहरातील भीमनगर येथील दीक्षाभूमी कट्यासमोर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी आमदार पाटील यांनी मंजूर केल्याबद्दल  डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती मंडळाचे व समाजाच्या नेत्यांनी काल सांगोला येथील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला भीमनगर येथे  मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निधी मंजूर केल्याबद्दल


 आमदार शहाजीबापू पाटील पाटील यांचे आभारही  मानले. दीक्षाभूमी कट्या समोर  संस्कृतिक  भवन  बांधणे या  कामामुळे भिमनगर परिसराला अजून अधिकच  शोभा  येणार आहे हे सभागृह समाजातील छोट्या-मोठ्या विविध कार्यक्रमासाठी सहजरित्या  मोफत उपलब्ध होणार असल्याने  समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले दीक्षाभूमी कट्ट्यासमोर  सांस्कृतिक भवन बांधणे कामाच्या अनेक वर्षाच्या मागणीला अखेर


 आमदार शहाजीबापू पाटील यांनी न्याय दिला अशा भावना समाजबांधवांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी पायाभूत सुविधांसह सर्व समावेषक सर्वांगीण विकासाचे धोरण अवलंबले  असलेने सर्व समाजांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आतापर्यंत नगरपालिका क्षेत्रामध्ये ३०कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे येणाऱ्या काळातील सर्व कामे पूर्ण झाल्यावर  सांगोला शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे


 सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भरघोस  निधी मंजूर होत असल्याने महाविकासआघाडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे  सांगोला शहरातील मंजूर निधींची सांगोला शहरात खुमासदार  चर्चा चालू आहे.


 या सत्कार समारंभ प्रसंगी, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ माजी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, माजी उपनगराध्यक्ष व भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, अरुण बनसोडे, माजी नगरसेवक सूरज बनसोडे, माजी नगरसेवक सोमनाथ ठोकळे,आबा बनसोडे, बाळासाहेब बनसोडे,कीर्तीपाल बनसोडे, कुंदन बनसोडे, विनोद रणदिवे, शेखर गडहिरे यांच्या सह समाजबांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments