Breaking News

‘एमपीएससी’चा सर्वात मोठा निर्णय, परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमातही बदल..!!

 ‘एमपीएससी’चा सर्वात मोठा निर्णय, परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमातही बदल..!!

‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यसेवा परीक्षेची पद्धत, तसेच अभ्यासक्रमातही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी ‘राज्यसेवा परीक्षा-2023’पासून केली जाणार आहे.


‘एमपीएससी’साठी वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत व लेखी परीक्षा, असे एकूण 2025 गुण, असे सुधारित परीक्षा योजनेचे स्वरुप असणार आहे. तसेच आयोगाने अभ्यासक्रमातही बदल केला आहे. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली..


समितीच्या शिफारशीवर निर्णय..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राज्य सेवा पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक दोन.. अर्थात ‘सी-सॅट’ हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरावा, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी आयोगाने एक समिती नेमली होती.


माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांचा या समितीत समावेश होता. या समितीच्या शिफारसीनुसार ‘सी-सॅट’ विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने काही दिवसांपूर्वी जाहीर केला.


समितीने राज्यसेवेची परीक्षा योजना व सुधारित अभ्यासक्रमाबाबतही शिफारसी केल्या होत्या. समितीच्या शिफारशी आयोगाकडून आज स्वीकारल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.. अर्थात, 2023 पासून या बदलांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले..


याबाबत ‘एमपीएससी’चे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले, की सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमामुळे अधिकाअधिक गुणवत्ताधारक उमेदवार उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments