google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयात "शिवस्वराज्य दिन "साजरा.

Breaking News

विज्ञान महाविद्यालयात "शिवस्वराज्य दिन "साजरा.

 विज्ञान महाविद्यालयात "शिवस्वराज्य दिन "साजरा.

                   विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे" शिवस्वराज्य दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत इंगळे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ फुले प्रा. किसन पवार प्रा. अशोक वाकडे .विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रकांत इंगळे शिवछत्रपती शिवाजी राजे यांच्या "राज्याभिषेक" व "शिवस्वराज्य दिन "साजरा करण्यापाठीमागची कारण स्पष्ट करत असताना ते बाराव्या शतकापासून इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतात.  यादवांचे, रामदेवराव यांचे राज्य तत्कालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन मोगली साम्राज्य किती अतिरेकी व अन्यायकारक होते. हिंदू धर्म व्यवस्थेला मारक होते. स्त्रियांवर  अन्याय, अत्याचार, व हिंदू धर्म मंदिरांची विटंबना हीखूप मोठ्या प्रमाणात होत होती. अशा या मोगली साम्राज्यातून हिंदू धर्म व्यवस्थेला मुक्त करण्यासाठी एका विचाराची तत्वाची, व मार्गदर्शनाची गरज होती हे, मार्गदर्शन शिवछत्रपती महाराज यांच्या रूपाने मिळालं आणि तत्कालीन सामाजिक, संस्कृती, राजकीय व आर्थिक परिस्थिती बदलू लागली. लोकांना रयतेच्या राज्याची गरज होती. लोकांना स्वातंत्र्य हवे होते.या स्वातंत्र्यासाठी, हक्कासाठी अनेक पराक्रमी मावळे धारातीर्थ पडले . आपले बलिदान शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार आदिलशहा , अफजल खान मोगली साम्राज्य उलथून टाकली. स्वराज्य हे धनदांडगे जे होते अन्याय अत्याचाराच्या ओझ्याखाली जनता दडपली जात होती यातून मुक्तता करण्यासाठी हवे होते. आणि हेच स्वराज्य छत्रपती शिवरायांनी दिले म्हणून आज आपण" शिवस्वराज्य दिन" साजरा करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा असल्याने महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना याच विचाराने प्रेरणेने जगले पाहिजे व सर्वसामान्य माणसाला न्याय हक्क व जगण्याची व्यवस्था निर्माण केली. पाहिजे तरच आपण छत्रपती शिवराय यांचा शिवस्वराज्य दिन साजरा केल्याचा मनस्वी आनंद होईल सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी आपल्या आयुष्याच्या जगण्याच्या या प्रेरणास्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांची विचार ठेवून जगले पाहिजे तरच आपण स्वराज्य निर्माण केले असे म्हणता येईल असे म्हणता येईल . प्रमुख पाहुणे यांनी शिवस्वराज्य दिनानिमित्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या प्रतिभेला अभिवादन केले.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रघुनाथ फुले यांनी छत्रपती शिवराय यांचे कार्य कर्तृत्व व मोगली साम्राज्य पासून हिंदू धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणारे शिवछत्रपती होते. धर्म व्यवस्थेवर होणारा अन्याय, अत्याचार थोडक्यात स्पष्ट करू हिंदू धर्म व्यवस्थेला न्याय देणारे एकमेव राजे म्हणजे शिवछत्रपती ही होय. असे विधान करून विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या आयुष्यामध्ये शिवछत्रपतींचे विचार आत्मसात करून 

सर्वसमावेशकता, समानता, न्याय, जोपासली पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.

              कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीताने सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .अशोक वाकडे .यांनी केले कार्यक्रमाचे आभार अविनाश लोखंडे. यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थी तिने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments