Breaking News

दुर्दैवी उद्या वाढदिवस आज अंत्ययात्रा १७ वर्षीय मुलीने रेल्वे समोर उडी घेऊन केली आत्महत्या…

 दुर्दैवी उद्या वाढदिवस आज अंत्ययात्रा १७ वर्षीय मुलीने रेल्वे समोर उडी घेऊन केली आत्महत्या…

 अकोल्याकडून नागपूर कडे जाणाऱ्या रेल्वेसमोर उडी घेऊन एका १७ वर्षीय युवतीने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गुरधी रेल्वे गेट येथे घडली घडली. असून श्रृती नाजूकराव डांगे असे या युवतीचे नाव असून मोठी उमारी येथील रहिवासी असलेल्या या युवतीने हा कठोर निर्णय का घेतला हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही. विशेष बाब म्हणजे उद्या १३ जून रोजी या युवतीचा वाढदिवस होता पण आज या मुलीची अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


पंचनामा करताना पोलीस

आत्महत्या हा जागतिक प्रश्‍न आहे. चुकीची जीवनशैली अंगीकारल्यामुळे जीवनात तणाव निर्माण होतो व तो तणाव जेव्हा झेपेनासा होतो तेव्हा लोक आत्महत्या करतात दहा ते १९ वर्षापर्यंतच्या अवस्थेला पौगंडावस्था किंवा किशोरवयीन अवस्था असे म्हणतात. मुलांचे बालपण संपून प्रौढपणा येईपर्यंतचा हा काळ असतो. तरुण मुलांच्या आत्महत्येला प्रामुख्याने मुलांमध्ये विविध कारणांनी येणारे नैराश्य हे प्रमुख कारण असते. नैराश्य विविध कारणांनी येते. मात्र, तरुण हे अतिउत्साही असतात, तसेच ते अतिसंतापी देखील असतात. त्यांच्या मनात एक क्षण असा येतो की, ज्यावेळी त्यांच्याकडून आत्महत्येसारखी कृती घडते अशीच ऐक घटना काल सिव्हील लाईन पोलीस पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुरधी येथील रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली.


छिन्नविच्छिन्न मृदेहाचे अवशेष

१७ वर्षीय युवतिने रेल्वे समोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपल्याची माहिती सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला मिळाली माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला सदर युवतीने आपली दुचाकी एम. एच. २७ बी. के. ०३८२ कडेला पार्क करून आत्महत्या केली असल्याची माहिती प्रथम दर्शनीय तपासात समोर आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता गाडीच्या डीक्कित लायसन ची झेरॉक्स मिळून आली. 


सदर झेरॉक्स वर अनंतराव मारुतीराव अम्बाडकर राहणार त्रिमूर्ती भक्तिधाम जवाहर नगर अमरावती असे नमूद केले होते सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी आपले तपास चक्र फिरविले असता सदर युवतीचे वय हे अंदाजे १७ वर्ष असून श्रृती नाजूकराव डांगे राहणार मोठी उमारि राष्ट्रीय शाळेजवळ भाड्याच्या घरात राहत असून या मुलीचे वडील हे निशांत बँकेत कार्यरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

घटनास्थळी आढळलेली गाडी आणि बुट

श्रुती अकोल्यातील आर. डी. जी. कॉलेज मधे इयत्या १२ वित शिकत असून मनमिळाऊ व हसऱ्या श्रूतीचा १३ जून रोजी वाढदिवस आहे

Post a Comment

0 Comments