मुस्लिम धर्म संस्थापक शांतिदूत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल खोटे व बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सांगोला बंदचे आवाहन

मुस्लिम धर्म संस्थापक पैगंबर खोटे व बदनामीकारक शांतिदूत प्रेषित मोहम्मद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ समस्त मुस्लिम समाज बांधव सांगोला शहर यांच्या वतीने आज सांगोला बंदचे आवाहन करण्यात आले आहे . 


आज सोमवार दि . १३ जून रोजी सर्व सांगोला शहरवासियांना सांगोला शहर मुस्लिम समाजातर्फे आव्हान करण्यात आले आहे की , नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मुस्लीम धर्म संस्थापक , शांतिदूत , प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल खोटे व बदनामीकारक वक्तव्यकेले आहे . त्यामुळे समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत . 


मुस्लिम धर्म संस्थापक शांतिदूत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल खोटे व बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सांगोला शहर मुस्लिम समाजाच्या वतीने सांगोला बंदचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे . तरी सांगोला शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या बंदला प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुस्लिम समाजातर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहे .