Breaking News

सांगोल्यात “डोंगार”फेम शहाजीबापू विरोधात शिवसैनिकांचा आक्रोश

 सांगोल्यात “डोंगार”फेम शहाजीबापू विरोधात शिवसैनिकांचा आक्रोश 

जनतेने शिवसेनेवर विश्वास ठेवून मतदान केले. मात्र, पक्षाशी गद्दारी केलेल्या शहाजी पाटील यांना येत्या निवडणुकीत पराभूत करण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली. प्रचंड संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त केला.

सांगोला/ राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा २० वर्षाचा वनवास संपवला त्यांच्या कृपने मी आमदार झालो असे वारंवार जनतेसमोर सांगत आलेले सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेनेशी गद्दारी करत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीस साथ दिली आहे. शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून यांचा प्रचार केला. जनतेने शिवसेनेवर विश्वास ठेवून मतदान केले. मात्र, पक्षाशी गद्दारी केलेल्या शहाजी पाटील यांना येत्या निवडणुकीत पराभूत करण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली. प्रचंड संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त केला.


गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोला तालुक्यातील विविध विकास कामांसाठी जवळपास अडीचशे कोटींचा निधी दिला. तर आणखी जवळपास आठशे कोटींच्या कामाचे प्रस्ताव दाखल आहेत. असे असताना शहाजी पाटील यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे.


वर्षानुवर्षे पडिक असलेल्या शहाजी पाटील यांना लोकांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून मतदान केले. मात्र, पक्षाशी गद्दारी केलेल्या शहाजी पाटील यांना येत्या निवडणुकीत पराभूत करण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली. प्रचंड संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त केला.


त्यांना यापुढे सांगोला तालुक्यातील जनता कधीच माफ करणार नाही अशी भूमिका शिवसेनेचे पंढरपूर विभाग प्रमुख संभाजी शिंदे यांनी आज सांगोला येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत मांडली. तर शिवसैनिक त्यांना पुन्हा आमदार होऊ देणार नाही असा इशाराही संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

आज सांगोला येथे शिवसैनिक व शिवसेनेचे विविध पदाधिकारी यांनी बैठक घेत आमदार शहाजी पाटील यांचा निषेध करण्यात आला.


यावेळी संतप्त शिवसैनिकांनी आ.शहाजी पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. या बैठकीत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, सांगोला तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब, युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नीलवाघमारे,आशाताई टोणपे,युवती सेना तालुका संघटक पूनम अभंगराव,संगीता पवार,भारत गवळी,भारत मोरे,अरविंद पाटील आदींनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.


या बैठकीस युवा सेना तालुका प्रमुख सुभाष भोसले,शंकर मेटकरी,उपतालुका प्रमुख प्रवीण शिंदे,विभाग प्रमुख महेश इंगोले,युवा सेना शहर संघटक महावीर अभंगराव,संघटक शांताराम यादव,सुधाकर माळी,शिवाजी जाधव,नवल गाडे,विभाग प्रमुख संतोष खडतरे,उपतालुका प्रमुख गोरख येजगर,विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड,नवल गाडे,रेहाना आतार,मंजुळा दोंडमिसे,गायत्री गायकवाड,सारिका जाधव यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी,शिवसेना महिला आघाडी,युवा सेना,युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments