Breaking News

सांगली: ‘त्या’ ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्या; पोलिस तपासात उघड!

 सांगली: ‘त्या’ ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्या; पोलिस तपासात उघड!

सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक खुलासा झाला आहे. म्हैसाळमधील उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील ९ लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवल्याचे सांगण्यात आले होत. मात्र, या ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या हत्याकांड प्रकरणी दोन व्यक्तीना अटक देखील करण्यात आली आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, म्हैसाळमधील त्या घरातील लोकांनी आत्महत्या केली नव्हती तर त्या नऊ लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहीती सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.


या हत्याकांडाप्रकरणी आब्बास महमंदअली बागवान वय ४८ वर्षे रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापुर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे वय ३० वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणा नाका, सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments