सोलापूर झेडपीची सदस्यसंख्या झाली 77 सांगोला तालुक्यातही 1 गट आणि 2 गण वाढले अंतिम प्रभाग रचना जाहीर
सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत 77 इतकी सदस्य संख्या झाली असून जिल्ह्यात 8 गट तर 16 पंचायत समिती गण नव्याने वाढलेले आहेत
निवडणूक आयोगाने गटाची रचना जाहीर केली. त्यातच सांगोला तालुक्यात 1 गट आणि 2 पंचायत समिती गण नव्याने जाहीरही झाले. सांगोला तालुक्यात यापूर्वी 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गण होते.
मागील 4 महिन्यापूर्वी हे निश्चित करण्यात आले होते. पण याच नव्याने केलेल्या गट स्थापनेने हरकती व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच्याच सूनावण्या पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडल्या.
या नव्या रचनेत अकोला आणि वाढेगाव हे दोन नवीनच गट झाले आहेत. यापूर्वी अकोला हा कडलास गटात तर वाढेगाव हे जवळा गटात होते. नेत्यांनीच आपल्या सोईसाठी असे गट फोडले आहेत.
त्यानंतर निवडणूक आयोगाने गटाची रचना जाहीर केली. त्यातच सांगोला तालुक्यात 1 गट आणि 2 पंचायत समिती गण नव्याने जाहीरही झाले. सांगोला तालुक्यात यापूर्वी 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गण होते.
या नव्या रचनेत अकोला आणि वाढेगाव हे दोन नवीनच गट झाले आहेत. यापूर्वी अकोला हा कडलास गटात तर वाढेगाव हे जवळा गटात होते. नेत्यांनीच आपल्या सोईसाठी असे गट फोडले आहेत





0 Comments