"शहीद अशोक कामटे संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला यश
लवकरच मिरज रेल्वे गेट नं(32A)भुयारी मार्ग सुरू होणार कामटे संघटनेच्या निवेदनाची DRM ऑफिस ने घेतली दखल
सांगोला( प्रतिनिधी) सांगोल्यातील मिरज रेल्वे गेट नं(32A)भुयारी मार्ग येथील भुयारी रेल्वे मार्गाचे काम संथगतीने सुरू होते याबाबत सोलापुरातील रेल्वेतील वरिष्ठ कार्यालयाकडे शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने तक्रार व निवेदने वारंवार दिली होती . हे काम वेळेत न पूर्ण केल्यास रेल रोकोचा इशाराहि देण्यात आला होता. येथे जाणाऱ्या नागरिक यांची दैनंदिन मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती अनेकांना बाह्यवळण रस्त्याचा वापर करून नाहक त्रास शहरवासीयांना होत होता ,येथील अनेक नागरिकांनी याबाबत शहीद अशोक कामटे संघटनेकडे सूचना केली होती त्याची तातडीने कामटे संघटनेची दखल घेऊन रेल्वे विभागाला या कामास जलद गतीने सुरुवात करण्यास सांगितले, गेल्या पंधरा दिवसापासून या कामाला गती देऊन येथील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वेच्या वरिष्ठ विभागाने अशोक कामटे संघटनेस दिले आहे . या कामाची विभागीय रेल्वे व्यवस्थापक व रेल्वे बांधकाम विभाग यांची दखल घेतल्याबद्दल शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेचे येथील नागरिक आभार मानून ,अभिनंदन करीत आहे यापुढील काळातही शहीद अशोक कामटे संघटना येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.


0 Comments