google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिक्षकांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय, ग्रामविकास विभागाचा आदेश..!

Breaking News

शिक्षकांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय, ग्रामविकास विभागाचा आदेश..!

 शिक्षकांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय, ग्रामविकास विभागाचा आदेश..!

राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे… राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया उद्यापासून (ता. 9) सुरू होत आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘पोर्टल’चे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.. यंदा प्रथमच शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम ‘मे. विन्सीस’ या स्वॉफ्टवेअर कंपनीला दिले होते. कंपनीकडून आता स्वॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाले असून, डमी प्रयोग करून बदल्यांची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.


आतापर्यंत जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची रिक्त पदे 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आंतरजिल्हा बदल्यांत सहभागी करून घेतले जात नव्हते. मात्र, आता अशा जिल्हा परिषदांनाही आंतर जिल्हा बदलीत सहभागी करून घेतले जाणार आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशात ही बाब नमूद करण्यात आली आहे.. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविली जात आहे.. 10 टक्क्यांपेक्षा अधिक रिक्त पदे असलेल्या जिल्हा परिषदांनाही या बदली प्रक्रियेत सहभाग घेता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील झेडपी शाळांची स्थिती…


एकूण शाळा – 2797

विद्यार्थी संख्या – 2.02 लाख

एकूण शिक्षक – 9287

विज्ञान शिक्षक मंजूर – 737

विज्ञानाचे शिक्षक कमी – 687

राज्यात नवीन शिक्षक भरती नाही, रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने अनेक जिल्ह्यांमधील शिक्षकांना बदलीच मिळालेली नाही. मात्र, आता जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर तेथील बदली झालेल्या शिक्षकांना अन्य जिल्हा परिषदांमध्ये बदलीने कार्यमुक्त करणे शक्य होणार आहे.


आता 10 टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असली, तरीही सर्व जिल्हा परिषदांना ऑनलाइन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जाणार आहे. आंतरजिल्हा बदली किंवा नवीन शिक्षक भरतीनंतर संबंधित जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास, तेथील शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून त्यांना हव्या त्या जिल्ह्यात जाता येईल. जिल्हा परिषद शाळांमध्ये काही वर्षांपासून विज्ञान शिक्षकांची 687 पदे रिक्त आहेत. पण, आता 9 जूननंतर बारावी विज्ञान विषयातून उत्तीर्ण झालेल्या साडेबाराशे उपशिक्षकांना समुपदेशनातून त्या ठिकाणी संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments