google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी चे मुख्याध्यापक मोहन वाघमारे सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार संपन्न.

Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी चे मुख्याध्यापक मोहन वाघमारे सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार संपन्न.

 न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी चे मुख्याध्यापक मोहन वाघमारे सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार संपन्न.

सांगोला (प्रतिनिधी)- सांगोला तालुका शेतकरी  शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी चे मुख्याध्यापक मोहन वाघमारे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने  सांगोला तालुका शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी संस्थेचे  चेअरमन उल्हास कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सांगोला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी बिबीशन रणदिवे  यांच्या हस्ते  सपत्नीक सत्कार करण्यात आला. 


यावेळी प्रथमतः राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


श्री मोहन विठोबा वाघमारे हे मूळचे इटकि येथील असून त्यांचे शिक्षण एम ए बी एड झालेले आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटकि येथे झालेले आहे माध्यमिक शिक्षण लोटेवाडी येथे झालेले आहे तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर कॉलेज येथे झालेले आहे. या संस्थेतील प्रथम नोकरी सिताराम महाराज विद्यालय खर्डी तसेच मेडशिंगी उदनवाडी या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केले आहे तर लोटेवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज केले आहे गावातील ग्रामस्थ शिक्षक  राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


    यावेळी सांगोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे , लोटेवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन उल्हास कुलकर्णी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव अरुण वाघमारे, सदाशिवराव निवासी प्रशाला चांदापुरी चे संस्थापक अध्यक्ष  डॉ कुमार लोंढे ,प्राध्यापक शरद वाघमारे ,काँग्रेसचे नेते रवी प्रकाश साबळे, काँग्रेसचे सांस्कृतिक विभाग राज्य उपाध्यक्ष महादेव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष फिरोज मनेरी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे ,मुख्याध्यापक कटफळ चे शिवाजी टकले, दादासाहेब वाघमारे ,ज्ञानेश्वर वाघमारे, अशपाक पठाण, दिपेन कुलकर्णी, सुरेश वाघमारे, येडगे सर, कुंभार सर ,गोडसे सर, लवटे सर, दीप्ती कुलकर्णी मॅडम, अरविंद सावंत, चंदू सोनलकर, चंद्रकांत वाघमारे ,शैलेश आईवळे ,बंडगर सर, आनंदा रोंगे सर ,मधु गायकवाड सर, गौतम सरतापे, प्रदीप वाघमारे ,माजी मुख्याध्यापक- नानासाहेब चव्हाण, राजकुमार मागाडे या सह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी येडगे सर, प्राध्यापक शरद वाघमारे, मुख्याध्यापक शिवाजी टकले व डॉक्टर कुमार लोंढे यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या 

सूत्रसंचालन बी व्ही नवत्रे सर यांनी केले तर आभार डी एस लवटे सर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments