google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 50 हजार रुपये? राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय..

Breaking News

शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 50 हजार रुपये? राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय..

 शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 50 हजार रुपये? राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय..

राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची माहीती दिली. काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार सविस्तर जाणून घ्या..


नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदानाचे वाटप 1 जुलै या कृषी दिनापासून करण्यात येणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात विशेष बैठक आयोजित केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक घेण्यात आली असून अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येईल असे अजित पवारांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

राज्यातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व जीवितहानी यांसारखे गंभीर गुन्हे सोडून शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांवर जे इतर गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घेण्यात येणार आहेत’, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली.


सध्या आपल्या राज्यात ऊसाचे मोठे उत्पादन व गाळप झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये राज्य सरकारने आवश्यक उपाययोजना केल्यात आणि जर ऊस शिल्लक राहिलाच तर शिल्लक राहिलेल्या ऊसाला शासन भरपाई दिली जाण्याबाबत निर्णय घेऊ शकते. दधाला एफआरपी देण्यासंदर्भातील प्रस्ताव समितीकडे पाठवला की अभ्यासाअंती योग्य तो निर्णय घेऊ. तसेच कांदा निर्यातीवरील बंदीच्या बाबतीत सरकारकडून केंद्र सरकारकडे ठराव सादर करण्यात येईल, असं ते म्हणाले.


शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांसोबतच राज्यात संशोधन वाढून कृषी विकासास चालना मिळायला हवी, असंही ते म्हणाले. प्राप्त माहीतीनुसार, या बैठकीत कृषीमंत्री दादाजी भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही संबंधीत विभागामार्फत शेतकऱ्यांच्या फायद्याची व अनेक निर्णयांची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments