Breaking News

बोलणे बंद केल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणीचा खून!

 बोलणे बंद केल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणीचा खून!

गुन्हापुणे : चाकणमध्ये 18 वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला. विष्णुकुमार सहा असे आरोपीचे नाव आहे तर प्रीती सहा असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. चाकण पोलिसांनी विष्णुकुमार याला अटक केली आहे. घरात कोणी नसताना आरोपी विष्णुकुमार याने प्रीतीचा गला आवळून तिचा खून केला आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, आरोपी विष्णुकुमार आणि प्रीतीच्या आईचा काही कारणावरून वाद झाला होता. ते दोघे एकाच कंपनीत काम करत होते. पण वादामुळे प्रीतीची आई विष्णुकुमार याच्यासोबत बोलत नव्हती. 


त्यामुळे प्रीतीने देखील त्याच्याशी बोलणे बंद केले होते. आई बोलत नसल्याने आधीच चिडलेल्या विष्णुकुमार याने आज घरात कोणी नसताना प्रीतीचा गळा दाबून खून केला.दरम्यान, स्थानिकांनी याबाबत बोलिसांना माहिती दिली. चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विष्णुकुमार याला ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments