ब्रेकींग! पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, 10 लाख नोकऱ्या देणार?
देशातील लोकांना नोकऱ्या देण्याच्या उद्देशाने, मागील दोन वर्षांत झालेले बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोदी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानवी संसाधनांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेऊन पुढील दीड वर्षांमध्ये 10 लाख नोकऱ्या देणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारच्या पीएमओ या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटनुसार, येत्या दीड वर्षामध्ये तब्बल 10 लाख जणांना नोकऱ्या देणार असल्याचं म्हटलं आहे, याविषयी निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत. तसेच वेगवेगळ्या मंत्रालयांना आणि विभागांना संबंधित विभागांमध्ये पदभरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पीएमओ इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार नोकरभरती कधी सुरु होणार, याकडे बेरोजगारांचे आणि इच्छुकांचे डोळे लागले होते. अखेर आता लवकरच पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. नोकरभरतीसाठी केंद्र सरकारकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. नोकरीचं मिशन मोड राबवण्यासाठी केंद्र सरकार विशेष पावलं उचलण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात पदभरती करण्यात आलेली नव्हती. हजारो रिक्त पदं केंद्र सरकारमध्ये असून ही पदभरती केव्हा केली जाणार, असा सवालही उपस्थित केला जात होता. आज मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नोकरभरतीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा आणि त्यासोबत निर्णयही जाहीर होण्याची शक्यता आहे.
देशातील जनता वाढत्या महागाईने जनता त्रासली आहे. असून लोकांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यात येत आहे. भारतात कोरोना काळात बेरोजगारीचा दर वाढला होता. मोदी सरकारने आता केलेली 10 लाख नोकऱ्यांची घोषणा युवक वर्गाला दिलासा देणारी आहे. यामुळे लवकरच विविध विभागांत लवकरच भरतीबाबत निर्णय झाल्यानंतर मोठ्या भरतीमध्ये बेरोजगार तरुण, तरुणींना रोजगार मिळेल, यानिमित्ताने भारतातील कोरोना काळात नोकऱ्या गेलेल्या लोकांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असणार आहे.


0 Comments