google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नवरदेव दारु पिवून वरातीत नाचत बसला, वैतागलेल्‍या नवरीने नवरदेवच बदलला!

Breaking News

नवरदेव दारु पिवून वरातीत नाचत बसला, वैतागलेल्‍या नवरीने नवरदेवच बदलला!

 नवरदेव दारु पिवून वरातीत नाचत बसला, वैतागलेल्‍या नवरीने नवरदेवच बदलला! 

आपल्‍याकडं लग्‍न म्‍हटलं की जल्‍लोष, गोंधळ, नाचगाणं आणि बरचं काही हे ठरलेच असतं. आयुष्‍यातील हा क्षण अविस्‍मरणीय करण्‍यासाठी वधू-वराची धडपड सुरु असते. वर-वधूच्‍या आनंदाला उधाण आलं की, देहभानच हरपून जातं. मात्र असाच अतिउत्‍साह एका नवरदेवाच्‍या चांगलाच अंगलट आला आहे. बाहुल्‍यावर पोहचण्‍या आधीच वैतागलेल्‍या नवरीने दुसर्‍या गळ्यात वरमाळा घालून विवाहही उरकून घेतला.  राजस्‍थानमधील झालेल्‍या ‘या’ लग्‍नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे.


नवरदेव बेधुंद हाेवून नाचतच राहिला

त्‍याच असं झालं, राजस्‍थानमधील चुरु जिल्‍ह्यघतील राजगढ तालुक्‍यातील चेलाना गावात एका विवाह समारंभाचे आयोजन करण्‍यात आले. बहुतांशवेळा असतं तसे लग्‍न वधू पक्षाकडे होते. सर्वजण नवरदेवाची वरात येण्‍याची वाट पाहात होते. लग्‍न होण्‍याच्‍या आनंदात हरियाणातील सिवान येथील नवरदेव सुनील हा वधूच्‍या गावी आला. 


रात्री ९ वाजता वरातीबरोबर मांडवाकडे तो निघालाही;पण मित्रांच्‍या आग्रहास्‍तव त्‍याने मद्‍यप्राशन केले. त्‍यानंतर नाचणेही आलेच. नवरदेव आणि त्‍यांचे मित्र बेधुंद होवून नाचू लागले. पहाटेचे दोन वाजले तरी त्‍यांचे दारु पिणे आणि नाचणं सुरुच राहिलं. वधूसह तिचे नातेवाईक या धिंगाण्‍याला वैतागले.पहाटे लग्न झालं ; पण नवरदेव बदलला तब्बल पाच तास वरातीत धुडगूस घालणाऱ्या नवरदेव व त्याच्या मित्रांवर सारेच वैतागले .


 या साऱ्या प्रकाराने दारु पिवून धिंगाणा घालणाऱ्या तरुणाबरोबर लग्नास वधूने नकार दिला . त्याचवेळी तिच्या नातेवाईकांनी नियोजित मांडवात परिचित असणाऱ्या तरुणाला विचारणा केली . त्यानेही लग्नास होकार दिला . यानंतर विवाह सोहळा पार पडला ; पण चर्चा दारु पिवून वरातीत नाचणाऱ्या आणि लग्न न करताच परत जावे लागलेल्या मदयधूंद नवरदेवाचीच रंगली .

Post a Comment

0 Comments