google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यार्थ्यांनो लक्ष द्या ! परीक्षेसाठी प्रतितास मिळणार १५ मिनिटांचा अधिक वेळ

Breaking News

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या ! परीक्षेसाठी प्रतितास मिळणार १५ मिनिटांचा अधिक वेळ

 विद्यार्थ्यांनो लक्ष द्या ! परीक्षेसाठी प्रतितास मिळणार १५ मिनिटांचा अधिक वेळ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. यातच परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटांचा ज्यादा वेळ विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहे.


याचाच अर्थ असा कि, जर तीन तासाचा पेपर असल्यास विद्यार्थ्यांना प्रतितास १५ मिनिटे याप्रमाणे तब्बल ४५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे, याबाबतची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा होतील.


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी, एमए, एमकॉम, एमएससी, एमबीए, एमसीए या पारंपारिक व व्यवसायिक विद्याशाखांच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन होतील .परीक्षेसाठी शहरात २४ तर ग्रामीण भागातील विविध महाविद्यालयांमध्ये ४७ केंद्रे असणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मिळून ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Post a Comment

0 Comments