google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग: राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी होणार? त्यासाठी पोलिसांनी….

Breaking News

ब्रेकिंग: राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी होणार? त्यासाठी पोलिसांनी….

 ब्रेकिंग: राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी होणार? त्यासाठी पोलिसांनी….

आज अर्थात सोमवारी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील बहुचर्चित सभा पार पडली. महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांच्या नजरा या सभेकडे लागल्या होत्या.


परंतु आता या सभेनंतर औरंगाबाद पोलीस सूत्रांच्या हवाल्याने झी न्यूज हिंदी ने वृत्त दिले आहे की, पोलीस राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण ऐकणार आहेत. यानंतर ते कायदेशीर टीमचा सल्ला घेतील.या रॅलीचे आयोजन करण्यापूर्वी आयोजकांना ज्या 16 अटी देण्यात आल्या होत्या, त्यांचे उल्लंघन झाले आहे की नाही हे पाहिले जाईल. उल्लंघन झाल्यास आयोजकांवर कारवाई होऊ शकते असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.


सभेदरम्यान राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या वादाचाही उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले की, मशिदींतील लाऊडस्पीकर काढण्यासाठी आम्ही 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता.

पण ईद 3 मे रोजी आहे. मला हा उत्सव खराब करायचा नाही.


सरकारने आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा 4 मे नंतर आम्ही कोणाचेही ऐकणार नाही, अशी आमची विनंती आहे. आमची मागणी पूर्ण न झाल्यास दुप्पट ताकदीने हनुमान चालीसा पाठ करू, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.‘यूपीमध्ये लाऊडस्पीकर काढले गेले मग इथे का नाही‘ : जर यूपीमध्ये लाऊडस्पीकर काढता येत असतील तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला. नियम सर्वांसाठी समान असावेत.


मी पुन्हा पुन्हा सांगतो की मशिदींवरील सर्व लाऊडस्पीकर बेकायदेशीर आहेत. त्यामुळे ते उतरावेत असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments