google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भावाचा अपघात झाल्याचे सांगून महिलेला घेऊन गेले , 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार ,

Breaking News

भावाचा अपघात झाल्याचे सांगून महिलेला घेऊन गेले , 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार ,

 भावाचा अपघात झाल्याचे सांगून महिलेला घेऊन गेले , 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार ,

पीडित महिला ही रस्त्यावर उभी होती. या महिलेला तुझ्या भावाचा अपघात झाला आहे असं सांगून आरोपींनी तिला दुचाकीवर बसवून…

दौंड, : पुण्यात  दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दौंड तालुक्यात एका महिलेवर सामूहिक बलात्काराची  संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील खोर गावामध्ये इनाम टेकडी येथील खिंडीचीवाडी ही घटना घडली आहे. पीडित महिलेल्या या निर्जनस्थळी नेऊन पाच आरोपींनी शनिवारी रात्री 8.30 ते 11.00 वाजेच्या दरम्यान अत्याचार केला. या घटनेतील पाच आरोपींना यवत पोलिसांनी 24 तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.


पीडित महिला ही रस्त्यावर उभी होती. या महिलेला तुझ्या भावाचा अपघात झाला आहे असं सांगून आरोपींनी तिला दुचाकीवर बसवून तीन किलोमीटर अंतरावर नेऊन एका मोकळ्या जागेत तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केला.


आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित महिलेनं यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर तातडीने पाचही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे दौंडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


पोलिसांनी ‘भाई’चे मुंडन करून गल्लीत फिरवले!


दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये फोनवर भाई म्हटला नाही म्हणून एका गुंडाने आपल्या साथीदारांसह एका तरुणा बेदम मारहाण केली होती. एवढंच नाहीतर जमिनीवर बिस्किट टाकून कुत्र्यासारखी ती बिस्किट खायला लावली होती. या संबंध प्रकाराचा व्हिडीओ आरोपींनी बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना बेड्या ठोकल्या. 


विशेष म्हणजे, आरोपींना अद्दल घडविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुंडांचं मुंडन करुन शहरात धींड काढली. याप्रकरणी आरोपींवर कलम 308, 324, 323, 504, 506, 143, 147, 149, 134 अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींपैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु आहे”, अशी माहिती कृष्ण प्रकाश यांनी दिली.

Post a Comment

0 Comments