कोल्हापूर जिल्ह्यातील घटना..भयंकर ! गुप्तांग सुरीने कापून पत्नीनेच केली पतीची निर्घृण हत्या
कोल्हापूर : अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने पतीचे जांभा दगडावर डोके आपटून, गळा आवळून आणि गुप्तांग सुरीने कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना सोमवारी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे घडली आहे. प्रकाश पांडुरंग कांबळे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संशयीत आरोपी वंदना प्रकाश कांबळे हिने गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश कांबळे हा पत्नी वंदनासह मांगुरवाडी येथील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून मागिल वर्षापासून होता. प्रकाश याला दारुचे व्यसन होते, यात तो पत्नीला दररोज मारहाण करत होता. पती अनैतीक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने पतीला दारुच्या नशेत असताना जांभा दगडावर तसेच गळा आवळून, सुरीने गुप्तांग कापून निर्दयीपणे ठार केले. पोलिसांनी घटनेची चौकशी केली असता संशयीत आरोपी वंदना हिने गुन्हा कबुल केला.
0 Comments