google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता!

Breaking News

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता!

 राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता!

नवी दिल्ली: काही तासामध्येच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर येऊन धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे. तसेच कोकण किनारपट्टीबरोबरच राज्यात ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या २ दिवसामध्ये केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.


१६ ते १९ मेच्या दरम्यान, महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता दर्शवली जात आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यात कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिला आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मॉन्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अगोदर केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकणार आहे. केरळमध्ये मान्सून साधारणपणे १ जून दिवशी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेच्या अगोदर म्हणजे २७ मे दिवशी केरळात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती.


परंतु, पुढच्या २ दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने आता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये विषववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपवणारे बळकट दमदार पावसाळी वारे आणि पुढील ५ दिवस जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान, निकोबार बेटे, व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता जाणवत असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे. पश्चिम बंगाल आणि ईशान्यकडील ७ राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments