google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार ?

Breaking News

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार ?

 महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार ?

उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार स्थापनेच्या घटनेला अडीच वर्षे उपटून गेलेली आहेत . मात्र , या पहाटेच्या शपथविधीवरून कधी भाजप नेते पवारांना टोले लगावत आहेत . तर कधी शिवसेना भाजपला . आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांना शपथविधीवरून डिवचलं आहे . पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार ? असा सवाल पटोले यांनी केला आहे . गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारमधील पक्षात धुसफूस सुरू आहे . अशात पटोले यांनी थेट राष्ट्रवादीवरच हल्लाबोल केला आहे . पटोले यांनी महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहण्याबाबतही विधान केले ते म्हणाले की , गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी

महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचा राजकारण करत आहे . अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनले होते . त्यांचे उल्लंघन होत आहे . त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही . पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे . पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील . येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील . आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही , असेही पटोले यांनी म्हंटले .

Post a Comment

0 Comments