google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अनुसूचित जाती जमाती विकास निधी कायदा राज्यात पारित करावा अशी मागणी करणारे मा. शहाजीबापू पाटील हे राज्यातील पहिले आमदार -मा. पंकजकुमार काटे

Breaking News

अनुसूचित जाती जमाती विकास निधी कायदा राज्यात पारित करावा अशी मागणी करणारे मा. शहाजीबापू पाटील हे राज्यातील पहिले आमदार -मा. पंकजकुमार काटे

 अनुसूचित जाती जमाती विकास निधी कायदा राज्यात पारित करावा अशी मागणी करणारे मा. शहाजीबापू पाटील हे राज्यातील पहिले आमदार -मा. पंकजकुमार काटे

    दि.11/5/2022 रोजी सांगोला विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा शहाजीबापू पाटील यांना नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीस चे 


सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. पंकजकुमार काटे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत भेटून राज्यात अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी बजेटचा कायदा करावा म्हणून चर्चा करून निवेदन दिले होते.सदर निवेदनाची दखल घेऊन मा.आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,व ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांना भेटून हा बजेटचा कायदा


 कर्नाटक,राजस्थान,छत्तीसगड मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर  लागू करावा कारण महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर याच्या पुरोगामी विचाराचा वारसा लाभला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी राज्यात अनुसूचित जाती जमाती विकास निधी कायदा पारित करणं गरजेचं आहे.अशा आशयाचे पत्र दिले आहे...


     या वेळी नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीस चे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.पंकजकुमार काटे यांनी बोलताना सांगितले की मा. आमदार शहाजी बापू पाटील हे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत ते सवर्ण वर्गातून येतात तरीही महाराष्ट्रात सर्वात प्रथम त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी बजेटचा कायदा करावा


 ही भूमिका घेतली बापूचा हा फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा वारसा जपण्याचा आदर्श राज्यातील इतर आमदारांनी व विशेष करून अनुसूचित जाती-जमातीतील (दलित-आदिवासी) आमदारांनी घ्यावा तसेच हा कायदा राज्यात लागू व्हावा यासाठी नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीस चे राज्यमहासचिव मा.ऍड केवली उके व राज्य सचिव मा. वैभव गिते हे कसोशीने राजस्तरावर प्रयत्न करीत आहेत


 तसेच येणाऱ्या काळात बौद्ध, अनुसूचित जाती-जमातींच्या हक्काचा निधी अखर्चित राहू नये म्हणून बजेटचा कायदा पारित करण्यासाठी मा.आमदार शहाजी बापू पाटील यांनी सातत्याने प्रयत्न करून या महाविकास आघाडीच्या सरकारला हा कायदा करण्यास भाग पाडाल्यास एन.डी.एम.जे संगठनेच्या व आंबेडकरी समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांची सांगोला शहरातून हत्ती वरून मिरवणूक काढणार असे सांगितले.

Post a Comment

0 Comments