धक्कादायक ! पती म्हणून जुळ्या भावाने केली वहिनीबरोबर ' मज्जा ' , 6 महिन्यानंतर पर्दाफाश झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा
जुळ्या भावांमध्ये कमालीचे साम्य असल्याचा फायदा घेत नवीन लग्न होवून घरी आलेल्या भावाच्या पत्नीवर सहा महिने दोघांनीही अत्याचार केल्याचा विचित्र प्रकार लातुरात समोर आला आहे. हा प्रकार तब्बल सहा महिन्यानंतर विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर जुळ्या भावांसह सासू सासऱ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
ही विचित्र घटना शहरातील रिंग रोड परिसरातील आहे. गतवर्षी एका 20 वर्षीय तरुणीचा लातुरातील एका तरुणाशी विवाह झाला. ज्या तरुणाशी विवाह झाला त्या तरुणास जुळा भाऊ असल्याचा गैरफायदा घेत पती आणि दिराने हा अत्याचार केला. भाऊ असून दोघांमध्ये कमालीचे साम्य आहे. त्यामुळे आपला पती कोणता हे ओळखणेच पीडित विवाहितेला जमले नाही. याचा जुळ्या भावाने तब्बल सहा महिने या विवाहितेवर बलात्कार केला.
हा प्रकार विवाहितेच्या लक्षात येताच तिने पतीला याची कल्पना दिली असता जे सुरू आहे तु सुरू राहू दे असा सल्ला सुरूच ठेवला. हा प्रकार वैतागलेल्या या विवाहितेने सासू-सासऱ्यांच्या कानावर घातले असता, हे असेच चालणार आहे. तुला नांदायचे आहे की नाही, असे म्हणत तिलाच दम देण्यात आला. काही दिवसानंतर ही विवाहिता माहेरी गेली.
तिला बोलावण्यासाठी तिचा दिर तिच्याकडे माहेरी गेला. यावेळी तिने सासरी येण्यास नकार दिला. माहेरच्या लोकांनी तिला सासरी न जाण्याचे कारण विचारल्यानंतर तिने सासरी सुरू असलेला हा प्रकार सांगितला त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही जुळ्या भावांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलकांते यांनी दिली.


0 Comments