google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अरे बापरे ! चितेवर पेट्रोल ओतल्याने उडाला भडका ! दहा बारा जण होरपळले… तीन जण गंभीर जखमी !

Breaking News

अरे बापरे ! चितेवर पेट्रोल ओतल्याने उडाला भडका ! दहा बारा जण होरपळले… तीन जण गंभीर जखमी !

 अरे बापरे ! चितेवर पेट्रोल ओतल्याने उडाला भडका ! दहा बारा जण होरपळले… तीन जण गंभीर जखमी !

चितेवर पेट्रोल ओतल्याने उडालेल्या भडक्यात दहा बारा जण होरपळल्याची विचित्र घटना पुण्यातील राजा बहादुर मिल रस्त्यावरील कैलास स्मशानभूमीत काल ( दि. ३० एप्रिल ) संध्याकाळी घडली आहे. यामध्ये दोन तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


ताडीवाला रस्ता परिसरातील रहिवासी दीपक प्रकाश कांबळे यांनी शनिवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ससूनमधील सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कैलास स्मशानभूमीत नेण्यात आला. मृतदेहाला अग्नी दिल्यावर प्लास्टिक कॅनमधील पेट्रोल चितेवर ओतण्यात आले. त्यावेळी स्मशानभूमीतील ब्लोअर यंत्रणाही सुरु करण्यात आली.


यामुळे एकदम भडका उडाला. चितेच्या जवळ असणारे दहाबारा जण यामुळे होरपळले. यातील दोन तीन जण गंभीर असस्थेत असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यांना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments