वाकी (घे) वि.का.स. सेवा सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
शेकापच्या ५० वर्षांच्या सत्तेला राष्ट्रवादीचा सुरुंग ; इतिहासात प्रथमच सत्तांतर
सांगोला : तालुका प्रतिनिधी गेली पन्नास वर्षांपासून म्हणजेच स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था वाकी घेरडी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापची धूळदाण उडवत सर्वच्या सर्व म्हणजे 13 जागांवर निर्विवाद विजय मिळविला व विकास सेवा सहकारी संस्थेवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार १०० मतांच्या फरकाने विजयी झाल्याने शेकापचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने अक्षरशः उध्वस्त केला असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एकता आघाडीतून सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून बाळासाहेब श्रीरंग शिंदे, दिगंबर अण्णा निमंग्रे, मच्छिंद्र संदीपान खांडेकर, रावसाहेब नाना शिंदे, बाळू भाऊसो चोपडे, अंकुष दशरथ निमंग्रे, तम्मा दऱ्याप्पा निमंग्रे व मारुती कृष्णा निमंग्रे हे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
तर महिला प्रतिनिधी म्हणून सौ. अलका शत्रुघ्न लवटे व श्रीमती भामाबाई गोरखनाथ झिंजुरटे इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून संतोष सुभाष चन्ने भ.जा. वि.जा. विमाप्र मतदार संघातून उमेश अण्णा खांडेकर तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून मच्छिंद्र विठ्ठल वाघमारे या १३ उमेदवारांनी प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभूत करून वाकी (घे) विकास सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला.
विकास सेवा सहकारी संस्थेच्या सर्व नूतन संचालकांचा रविवार दि 1 मे रोजी राष्ट्रवादी भवन येथे मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गावातील शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था असलेल्या विकास सेवा सहकारी संस्थेचा कारभार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या हितासाठीच करण्याचा सल्ला मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित सभासद व संचालक मंडळाला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राचार्य बाळासाहेब शिंदे, जवळा जि प गटाच्या मा. सदस्य स्वातीताई कांबळे, गणेश कांबळे, रफिक शेख गुरुजी, शत्रुघ्न लवटे गुरुजी व डॉ. पुण्यवंत निमंग्रे आदी नेतेमंडळींनी गावात कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.
वाकी (घे) सारख्या छोट्याशा गावात मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळींनी अल्पावधीतच प्रचंड विकासकामे केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वाकी गावात दिवसेंदिवस ताकद वाढू लागली आहे.
गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. लागोपाठ विकास सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून देत गावात बलाढ्य असलेल्या प्रस्थापित शेतकरी कामगार पक्षाच्या पॅनलचा दारुण पराभव केला.
सोसायटी स्थापन झाल्यापासून प्रथमच या सहकारी संस्थेत सत्तांतर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वाकी गावातून मिरवणूक काढून आपला विजयाचा आनंद व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभासदांच्या विश्वासाचा आणि विकासाचा विजय...!
आमचे नेते मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून गावात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावली. स्थापनेपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या संस्थेत विरोधकांनी "हम करे सो कायदा" असाच कारभार केल्याने संस्थेचे सभासद त्यांना वैतागून गेले होते.
५ वर्षात आम्ही वाकी (घे.) विकास सेवा सहकारी संस्थेचे चित्र बदलून टाकू आणि सामान्य सभासदांच्या हिताचा कारभार करू असा त्यांना विश्वास दिला होता. गावातील सभासद आणि लोकांनी विकास कामांवर आणि आमच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे हा विजय सभासदांच्या विश्वासाचा आणि विकासाचा आहे.
प्रा. बाळासाहेब शिंदे
पॅनल प्रमुख.


0 Comments