google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रेम प्रकरणातून स्वतःच्या मुलीचा खून करून आई-वडिलांनीच डोंगरात पुरला मुलीचा मृतदेह!

Breaking News

प्रेम प्रकरणातून स्वतःच्या मुलीचा खून करून आई-वडिलांनीच डोंगरात पुरला मुलीचा मृतदेह!

 प्रेम प्रकरणातून स्वतःच्या मुलीचा खून करून आई-वडिलांनीच डोंगरात पुरला मुलीचा मृतदेह!

कराड: स्वतःच्या मुलीचा खून करून आई-वडिलांनीच तिचा मृतदेह डोंगरात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. कराड तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला असून, भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विविध चर्चांना तोंड फुटले आहे. या प्रकरणी संशयित आई-वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १४ दिवसांपूर्वी पुरलेला मृतदेह आज (रविवार) बाहेर काढण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील एका गावात मुलीच्या प्रेमप्रकरणातून आई-वडिलांनीच तिचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील करत होत्या. तपास करत असताना त्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने त्यांनी वडिलांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी मुलीचे प्रेमप्रकरण असल्याची बाब समोर आली. त्यातूनच मग तिचा खून करून मृतदेह डोंगरात पुरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रविवारी (दि. १) पुरलेला मृतदेह बाहेर काढला. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह तहसीलदार विजय पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दूधभाते यांच्यासह पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रेखा दूधभाते करीत आहेत.तसेच सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments