google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुलींना उशीरा लग्न करणं पडेल महागात…

Breaking News

मुलींना उशीरा लग्न करणं पडेल महागात…

 मुलींना उशीरा लग्न करणं पडेल महागात…

पुणे : भारतातील मुलींच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर पूर्वीच्या काळी मुलींची लग्ने अगदी लहान वयात होत असत पण आता तसे राहिले नाही. आजच्या आधूनिक काळात मुलींनाही शिक्षण, नोकरी आणि करिअरमुळे उशिरा लग्न करायला आवडते. अनेक वेळा वाढत्या वयात लग्न झाल्यामुळे महिलांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच समस्यांबद्दल सांगणार आहोत.


जोडीदाराशी जुळवून घेणे कठीण : तरुण वयात महिलांचे लग्न झाल्याचा एक फायदा म्हणजे त्या तरुण असताना जोडीदाराशी जुळवून घेणे सोपे जाते. पण जेव्हा तुम्ही दीर्घकाळ अविवाहित आणि स्वतंत्र राहता तेव्हा मोठ्या वयात लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आवडीनिवडी आणि गरजांशी ताळमेळ राखणे काहीसे अवघड होऊन बसते. यामुळे अनेकदा नातेसंबंधात दुरावा येतो.


गरोदर राहण्यात अडचण : वयानुसार महिलांची प्रजनन क्षमता कमी होते. एका संशोधनात असे म्हटले आहे की वाढत्या वयामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही मूल होण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय वाढत्या वयानुसार महिलांना गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागतो आणि गर्भपात आणि प्रसूतीमध्ये अडचणी येतात. वृद्ध पालकांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना डाउन सिंड्रोम (मानसिक आणि शारीरिक विकार आणि इतर शारीरिक समस्यांचा धोका जास्त असतो.

Post a Comment

0 Comments