google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय..!

Breaking News

शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय..!

 शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय..!

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे मोफत गणवेश दिले जातात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी या अभियानांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे..


राज्यातील जिल्हा परिषदांसह इतर अनुदानित शाळांमधील जवळपास 35 लाख 92 हजार विद्यार्थ्यांना यंदा मोफत प्रत्येकी 2 गणवेशांचे वाटप केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे 600 रुपये खर्च येत असून, राज्य सरकारने तब्बल 221 कोटींची तरतूद केल्याचे सांगण्यात आले.


शासनाने याआधी विद्यार्थ्यांना थेट गणवेश देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यांवर गणवेशाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, थेट बँक खात्यावर रक्कम जमा करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आता ‘डीबीटी’ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पूर्णतः वगळली आहे. यंदा शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाणार आहे.


जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या

जिल्हा विद्यार्थी संख्या

अहमदनगर 1 लाख 57 हजार

अकोला 67 हजार

अमरावती 1 लाख 27 हजार

औरंगाबाद 1 लाख 52 हजार

भंडारा 55 हजार

बीड 1 लाख 14 हजार

बुलडाणा 1 लाख 38 हजार

चंद्रपूर 87 हजार

धुळे 94 हजार

गडचिरोली 63 हजार

गोंदिया 74 हजार

हिंगोली 70 हजार

जळगाव 1 लाख 61 हजार

जालना 1 लाख 6 हजार

यवतमाळ 1 लाख 56 हजार

वाशीम 61 हजार

वर्धा 37 हजार

भिवंडी 14 हजार

सोलापूर 1 लाख 52 हजार

ठाणे 70 हजार

कोल्हापूर 1 लाख 19 हजार

सिंधुदुर्ग 24 हजार

लातूर 85 हजार

नागपूर 71 हजार

नांदेड 1 लाख 60 हजार

नंदुरबार 99 हजार

नाशिक 2 लाख 80 हजार

मालेगाव 14 हजार

उस्मानाबाद 75 हजार

परभणी 84 हजार

पालघर 1 लाख 65 हजार

पुणे 1 लाख 59 हजार

रायगड 78 हजार

रत्नागिरी 51 हजार

सांगली 76 हजार

सातारा 83 हजार

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद, महापालिका, अनुदानित शाळांमधील सगळ्याच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी होत होती. ठाकरे सरकारनेही काही दिवसांपूर्वी तसा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे यंदा सरसकट पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार होते. मात्र, सरकारने आपल्या या निर्णयावरुन आता घुमजाव केलंय..


कोणाला मिळणार गणवेश..?

सध्या सरकारी व खासगी शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिली ते आठवीतील सरसकट मुली, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेशाचा लाभ मिळतो. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी, अपंग व खुल्या प्रवर्गातील मुलांना मोफत शालेय गणवेश दिले जात नाहीत.


शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी जुन्या पद्धतीनेच गणवेश मिळणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तरी साऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Post a Comment

0 Comments