google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा . डॉ . प्रकाश बनसोडे यांचे कॅन्सरवरील पुस्तक ऑस्ट्रेलिया मधून प्रकाशित

Breaking News

प्रा . डॉ . प्रकाश बनसोडे यांचे कॅन्सरवरील पुस्तक ऑस्ट्रेलिया मधून प्रकाशित

 प्रा . डॉ . प्रकाश बनसोडे यांचे कॅन्सरवरील पुस्तक ऑस्ट्रेलिया मधून प्रकाशित

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाच्या सांगोला महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ . प्रकाश अरुण बनसोडे यांचे मोलेक्युलार ड्रा टारगेटस् फॉर कॅन्सर थेरेपी हे आंतरराष्ट्रीय पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे


 सदर पुस्तक हे कॅन्सर वरील संदर्भ पुस्तक असून ते मेलबर्न सायंटिफिक पब्लिकेशन या प्रकाशना कडून व ऑस्ट्रेलिया या देशातून प्रसिद्ध झाले आहे . सदर पुस्तकाचे सहसंपादक म्हणून डॉ . बनसोडे यांनी काम पाहिले . प्रा . डॉ . बनसोडे यांनी ' इस्ट्रोजेन रिसेप्टर सिग्नलिंग इन ब्रेस्ट कॅन्सर ' या विषयावर सखोल व अभ्यासपूर्णलेखन केले आहे . 


महिलांमधील स्तनांचा कर्करोग हा गंभीर स्वरूपाचा आजार असून यावर जगभरामध्ये संशोधन सुरू आहे सदर पुस्तकाचा उपयोग कॅन्सरवर संशोधन करणार्या संशोधकांना व विद्यार्थ्यांना होणार आहेसदर पुस्तकाचे संपादक म्हणून प्रा . डॉ . अशोक पांडुरंगन , क्रिसेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चेन्नई यांनी काम पाहिले . सदर पुस्तक हे इ बुक व हार्ड कॉपी या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे 


त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष बाबुराव गायकवाड सचिव म.सी. झिरपे सर अध्यक्ष प्रा . पी.सी. झपके सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मधुसूदन बचुटे यांनी विशेष अभिनंदन केले . महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments