google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तालुक्यातील पेट्रोल पंपावर ग्राहकांना मोफत मिळणाऱ्या " या " सुविधांचा अभाव ; तहसिलदार अभिजीत पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी

Breaking News

तालुक्यातील पेट्रोल पंपावर ग्राहकांना मोफत मिळणाऱ्या " या " सुविधांचा अभाव ; तहसिलदार अभिजीत पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी

 तालुक्यातील पेट्रोल पंपावर ग्राहकांना मोफत मिळणाऱ्या " या " सुविधांचा अभाव ; तहसिलदार अभिजीत पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी

सांगोला /तालुका प्रतिनिधी ;- पेट्रोल , डिझेलच्या किमती दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चाललेल्या आहेत . पण पेट्रोलशिवाय गत्यंतर नसलेल्यांना ते खरेदी केल्या वाचून दुसरा काही पर्याय देखील नाही . पण पेट्रोल किंवा डिझेल घेणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल पंपावर काही सुविधा मोफत दिल्या जातात.


मार्केटिंग डिसिप्लिन गाईड लाइन्सनुसार काही नियम आखून देण्यात आले आहेत . याअंतर्गत ग्राहकांना नेमक्या कोणत्या सुविधा पेट्रोल पंपावर मोफत मिळतात हे जाणून घ्या.पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरल्यानंतर वाहनाच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी एक मशीन पेट्रोल पंपाच्या बाहेर येणाऱ्या मार्गावर एका कोपऱ्यात असतं हे तुम्ही पाहिलं असेल . याठिकाणी तुम्ही तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये मोफत हवा भरू शकता . पेट्रोल पंप चालकानं वाहन चालकांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे . त्यासाठी ग्राहकांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नाही .


पेट्रोल पंपावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असणं किंवा ती व्यवस्था करुन देणं पेट्रोल पंप मालकासाठी अनिवार्य आहे . पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक पिण्याच्या पाण्याची मागणी करू शकतात आणि ते उपलब्ध करुन देणं पंप मालकाचं कर्तव्य आहे . यासाठी पेट्रोल पंप मालक आरओ किंवा वॉटर प्युरिफायर लावतात . काही ठिकाणी फ्रिजची देखील व्यवस्था असते . पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध करुन देणं पंप मालकाची जबाबदारी आहे .


पेट्रोल पंपावर तुम्हाला दिल्या जाणाऱ्या पेट्रोलची गुणवत्ता चाचणी करण्याचाही ग्राहकाला अधिकार आहे . यात तुम्ही गुणवत्तेसोबतच प्रमाणाचीही तपासणी करू शकता किंवा त्याची विचारणा करू शकता . याशिवाय पेट्रोल पंपावर आणखी काही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोष्टी उपलब्ध असणं अनिवार्य आहे . यात आग विझवण्यासाठी लागणारी उपकरणं जसं की फायर सेफ्टी स्प्रे , रेतीनं भरलेल्या बादल्या इत्यादी .


फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच प्राथमिक उपचार कीट पेट्रोल पंपावर उपलब्ध असणं बंधनकारक आहे . यात प्राथमिक उपचारासाठीची काही औषधं , उपकरणं यांचा समावेश असतो . प्रत्येक पेट्रोल पंप मालकाला ही सुविधा मोफत देणं अनिवार्य आहे . अचानक कोणताही अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या औषधांचा उपयोग होऊ शकतो .


जर तुम्हाला आपत्कालिन परिस्थितीत कुणाला फोन करायचा असेल तर पेट्रोल पंपावर टेलिफोनची व्यवस्था असणं पेट्रोल पंप मालकांना बंधनकारक आहे . पेट्रोल पंप सुरू करण्यासोबतच पंप मालकाला एक फोन क्रमांक देखील रजिस्टर करावा लागतो . जेणेकरून पेट्रोल भरण्यासाठी येणारे ग्राहक त्याचा वापर करू शकतील .


परंतु सांगोला तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावर " या " पैकी ग्राहकांना मिळणाऱ्या  मोफत सुविधा महागाईचे पेट्रोल,डिझेल घेवूनही उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात यावी आणि मार्केटिंग डिसिप्लिन गाईड लाइन्सनुसार  नियम डावलणा-या पेट्रोल पंप चालकावर  तहसिलदार अभिजित पाटील यांनी कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments